दत्त दिगंबर दैवत माझे

हे गीत मी आईच्या तोंडून ऐकलेले आहे. जितके आठवले तसे आणि तितके लिहिले आहे. कवि/कवयित्री/मूळ गायक/गायिका माहिती नाहीत. चु.भू.द्या.घ्या.


दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे ॥ धृ.॥

अनुसुयेचे सत्त्व आगळे
तिन्ही देवही झाली बाळे
त्रैमुर्ती अवतार मनोहर
दीनोद्धारक त्रिभुवनी साजे ॥ १ ॥

तीन शिरे, कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी, पायी खडावा
भस्म विलेपित कांती साजे ॥ २ ॥

पाहुनी प्रेमळ सुंदर मुर्ती
आनंदाचे अश्रू झरती
सारे सात्त्विक भाव उमलती
हळूहळू सरते मीपण माझे ॥ ३ ॥