गोकुळीचा चोर

हे गीत मी आईच्या तोंडून ऐकलेले आहे. जितके आठवले तसे आणि तितके लिहिले आहे. कवी/कवयित्री/मूळ गायक/गायिका माहिती नाहीत. चु.भू.द्या.घ्या.


गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥


अवचित कान्हा घरात शिरतो
दहीदूधतूप चोरूनी खातो
धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥

पाण्यासी जाता घागर फोडी
भर रस्त्यावर पदराला ओढी
लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥

मुरलीधर हा नटखट भारी
खट्याळ काळा कृष्ण मुरारी
सोडू नका याला आता सोडू नका याला
चोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥