छंद
हा असा कसा जीवघेणा छंद जीवास लागे?
मन दुःखाच्याच वाटेवरी पुन्हा पुन्हा धावे
दुःखे लपविण्याची माझी जुनीच खोड आहे
पण,हास्यामागले अश्रू तुलाही न उमगावे?
हा खेळही जुना अन डावपेचही जुनेच हे
जिंकतानाही तुझ्यासाठी मी मुद्दाम हरावे
हा प्रस्ताव फेकला "त्यांनी"पुढ्यात माझ्या
तुला विसरावे किंवा जगणेच सोडून द्यावे
तूच सांग̱ देवा आता मी काय बरे करावे?
केवळ राखच उरता माझी हाती,आता काय जाळावे?
-सुप्रिया