पंतकाव्याला काव्य म्हणावे काय?

विलोमकाव्याच्या आस्वादातून ह्या प्रश्नाला तोंड फुटले असे वाटते. मनोगतावर अनेकांचा पंतकाव्याचा अभ्यास असेल असे वाटते. काहींना पंतकाव्य हे अतिशय कठीण अशाप्रकारचे काव्य वाटते, तर काहींना ते केवळ शाब्दिक कसरतीचे प्रकार वाटतात. पंतकाव्याबद्दलची आपली मते, अनुभव इत्यादी ह्या विवादविषयांतर्गत मांडावेत. आपले उलटसुलट मुद्दे मांडताना ते स्पष्ट करण्यासाठी पंतकाव्यातली उदाहरणेही देता आली तर चांगले होईल, असे वाटते.