गडचिरोली जिल्ह्यात आपल्या सर्च या सेवाभावी संस्थे द्वारे कुपोषण व बालमृत्यु संदर्भात काम करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. अभय व राणी बंग हे दांपत्य. यांना नुकताच आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मॅक ऑर्थर पुरस्कार घोषित झाला आहे त्या निमित्ताने पुण्यात त्यांची प्रगट मुलाखत होणार आहे. श्री अनिल अवचट या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
मुलाखत संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगममंच येथे होणार आहे.
प्रवेश निःशुल्क आहे. मात्र प्रवेशिका आहे.
अधिक माहितीसाठी दुवा .