नाव सुचलं नाही

त्या दिवशी ईथेच उभे होतो आपण
हो ! याच खिडकीपाशी
त्याच पलिकडच्या झाडाकडे पहात ,
जणु बोलल्याप्रमाणे त्याच्याशीच ...
तु म्हणाला होतास ठामपणे
" माझं अजिबात प्रेम नाहीये तुझ्यावर ...."
अन मीही मग आकाशात स्वच्छंदपणे उडणार्‍या ,
एकाकी पक्षाला सांगीतलं ....
" मलाही तु आवडत नाहिस अजिबात
अन प्रेम मी तुझ्यावर मुळीच नाही करत ....."
अन मग किती हलकं वाटलं होतं दोघांनाही
एक प्रश्न सहज सुटला म्हणुन ...
याच खिडकीपाशी नाही का ..?