हि पाककृती नविन नाही. जिरा राईस आणि उपासाची बटाट्याची भाजी यांना जोडून बनवलेला प्रकार आहे
भात नेहमीप्रमाणे शिजवावा. मिरच्या बारीक चिराव्या. उकडलेले बटाटे सोलून फोडी कराव्या. तेल किंवा तूप तापवून त्यात जिरे टाकावे. जिरे तडतडल्यावर बारीक चिरलेल्या मिरच्या आणि बटाटे टाकून हलवावे. मग भात आणि दाण्याचे कूट त्यात घालून चांगले हलवावे. फोडणी भाताला सर्वत्र समान लागली पाहिजे. थोडा वेळ परतल्यावर उतरवून त्यावर चिरलेली कोथिंबीर पसरुन गरम गरम खावे.