लळा हा लागला जिवा
मैत्रीचं अतुट नातं हे अपुलं
दोघांनीही सहज जपलं
कधी रडू तर कधी हसू
हास्यासहीत हे पुसले आसू
रोज माझा तुला, किंवा तुझा मला
एक तरी एसएमस नक्कीच आला
येणारा एसएमस हा तुझाच असतो
चुकून कधी तरी दुसऱ्याचा असतो
मैत्री ही अपुली थोडी खास
इतरांना कदाचीत होतो त्रास
खरं सागुं, मला तुझ्या मैत्रीचा लळा लागलायं
मैत्री मैत्री म्हणता, तुझ्यात माझा जीव गुंतलाय
सकाळी उठलो तरी तुझाच चेहरा
रात्री झोपलो तरी तुझाच चेहरा
वाटलं नव्हतं तुझ्या भोवती इतका गुंतेण
रेशमाच्या किड्याचा तंतू बनून
कळंत नाही मनाला गं माझ्या
का लागली आस संगतीची तुझ्या
ठाऊक आहेत बंधनं तुझी नी माझी
तरी सुद्धा लळा लागला हा जिवा
खरंच होतो त्रास, पाहुन तुझं ते हास्य
जेव्हा कळतं नशिबी नाही माझ्या हे हास्य
आता मात्र ठरवलयं, का करुन घ्यायचा त्रास
नाही गोष्ट नशिबी मग उगाचच का ठेवू आसं
आता फक्त एकच नातं, अपुल्या गोड मैत्रीचं
शिकलो एक गोष्ट मात्र
करेन गोड मैत्री फक्त, नाही लाऊन घेणार लळा
कारण, लागला जर लळा तर, सहन होत नाहीत गं या कळा
लळा हा लागला जिवा
आपला
क्षितीज येलकर