सावंताची सुधा - (भाग-१) - क्षितिज येलकर

सावंताची सुधा  - (भाग-१)


सुधा...
सुंदर अशी धारणा
नावातचं सर्व काही लपलयं


सावंताच्या तीन लेकी पैकी एक
सर्वात धाकटी, ती म्हणजे सुधा


सावंताच्या पोरी म्हणजे अगदी सरळ आणि सौम्य


चाळीतल्या गल्लीतून जेव्हा हा पक्षी बाहेर पडतो,
मग नाक्यावरच्या सर्व नजरा ह्या पक्षाकडे.


सहाजीकच कटाक्ष हा पडणारचं
कारण पक्षाचं सौंदर्य .... अप्रतीम.


ओठासहीत, गालवरची खळी जर खुलली
तर इतर सर्व पक्षी काही काळ, स्वर्गात.


अहो, इस्त्रीवाल्याच्या दुकाणाबाहेर लावलेला पिंजऱ्यातला पोपट
तो सुद्धा शिटी मारल्याशिवाय राहत नाही
आणि त्याला पाहुन जर ती हसली
तर मग, तो स्वत:भोवती गोल गोल फिरुन, अक्षरश: वेडा होतो.


बाजुच्या विहिरीजवळ धुणं धुणाऱ्या बायकांच्या धोक्याचा आवाज
दहा सेकंद स्तब्ध.
'काय सुंदर मुलगी आहे ना गं'
सर्वांच्या तोंडी हेच वर्णन.


सोनाराची नजर, नेहमीच तिच्या पैजंनाकडे
कधी एखादा घुंगरु पडतोय, ह्याचीच तो वाट पाहतो.


पांढाऱ्याशुभ्र इडलीसारखी दिसणारी सुधा
एकदा तरी माझ्या दुकानात येईल
इडलीवाल्याची हिच एक इच्छा.


आज सोमवार, सुधासाठी 'टवटवीत मोगऱ्याचा स्पेशल गजरा'
आणि त्यात पिवळ्या चाफ्याची छोट्टीशी कळी
पाच रुपये देऊन हा अलंकार, सुधाच्या केसात.


मोगरा व चाफ्याचा एकत्रित सुगंध
घेताच सुगंध, सुधा होई दंग.


कधी तुटेल, सुधाच्या सँडलची क्लीप
मोच्याच्या मुखी, हेच एक गीत.


अरे, बसं आली बसं
एवढ्यात सुधाने धावत जाऊन बस पकडली.


पुढील सुधा .. पुढच्या भागात.


आपला
क्षितिज येलकर