आतल्यासहित माणूस चा प्रयोग नगर येथे

परत एकदा पुढच्या प्रयोगाच्याबद्दल सांगण्यासाठी इथे येत आहे.


आपल्याला सर्वांना आठवत असेलच की काही अप्रकाशित कवितांना घेऊन मी त्यावर एक नाट्याविष्कार दिग्दर्शित केला आहे ज्याचे नाव 'आतल्यासहित माणूस' असे आहे.


ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवात अहमदनगर च्या केंद्रात आतल्यासहित माणूस चा प्रयोग होत आहे.


१२ नोव्हेंबर २००६
स्थळः सहकार बँक हॉल, अहमदनगर
वेळः रात्री ९ वा ३० मिनिटांनी


प्रयोगाची वेळ साधारण ७५ मिनिटे. प्रयोगाला मध्यंतर नाही.
१२ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही.


नगर व आसपासच्या परिसरातील सर्वांनी जरूर या.


नीरजा