गाजराची भाजी

  • ५,६ मध्यम गाजरे,१/२ वाटी मटारदाणे,१ टे‌. स्पून धने पूड,१,२ हिरव्या मिरच्या
  • साखर १ चहाचा चमचा ,मीठ चवीनुसार,फोडणीचे साहित्य,तेल,
  • ओलेखोबरे(नसल्यास सुके/डेसिकेटेड कोकोनट),कोथिंबीर
३० मिनिटे
२,३ जणांना

गाजरे धुवून,साले काढा‌. शेंडा,बुडखा कापून,उभे मध्ये चिरा व नंतर काप (काचऱ्या)करा.(साधारण अर्धगोलाकार काप होतील).तेल गरम करुन फोडणी करा,हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला,त्यात गाजराचे काप,मटार दाणे घाला,धनेपावडर घाला,परता,झाकण ठेवून एक /दोन वाफा येऊ द्या. नंतर मीठ,साखर घालून परता.खोबरे घाला,परत झाकण ठेवा‌‌. शिजू द्या ,नंतर  कोथिंबीर व हवे असल्यास अजून खोबरे घालून सजवा.
ही रसभाजी नाही,पाणी घालायचे नाही.
पोळी/फुलक्यांबरोबर खा.

जपान मध्ये असताना भाज्या फार मोजक्या मिळायच्या,तेव्हाच्या यशस्वी प्रयोगातील हा एक.

माझे पाकप्रयोग