पावसात भिजत भिजत त्या दिवशी मी फ़क्त तुला भेटायसाठी आलो होतो.
पन काय झालं काय माहित तुला पाहिल्यावर् पुन्हा मागे फ़िरलो होतो.
त्या दिवशी तु ज्या कवितेची तारीफ़ करत तु लिहिनाऱ्याचं नाव विचारत होतीस.
ती कविता खरं तर मीच लिहली होती पन नाव मात्र मी मित्राचं सांगितलं होतं
त्या दिवशी मी तुला म्हट्लं होतं की मला तुझी खुप आठवण येते.
तु मात्र सगळ्यासमोर दुसऱ्याच मुलीचं नाव घेउन मला चिडवलं होतं
आजकाल मी तुझ्याशी बोलतच नाहीये, कारण काय बोलावं तेच सुचत नाहेये.
पण तु मात्र, आता तो खुप शहाना झालाय असं चारचौघात म्हणतेयंस
माझ्या डोळ्यातल्या भावना तुला कळतच नाहीयेत का?
की मुद्दामच तुझा हा उंदीर मांजराचा खेळ चालू आहे.
आता अभ्यासात लक्षच लागत नाहीये.
पन तु मात्र मलाच अभ्यासतल्या शंका विचारत आहेस.
आता मात्र बास झालं परीक्षेच्या आधीच तुला मी सगळं सांगणार आहे.
तु मात्र तोच "आपण नुसते मित्र आहोत्" असं म्हणू नको. कारण् आता मी खुप पुढ़ं गेलो आहे