मॅगी पॅटीस

  • १ पाकीट मॅगी
  • २-३ उकडलेले बटाटे
  • १ कांदा
  • कोथिंबीर
  • १ मिरची
  • आले, लसूण हवे असल्यास
  • पावाचा चुरा अथवा रवा
  • १ चमचा कॉर्नफ्लॉवर
१५ मिनिटे
आवश्यकतेप्रमाणे

भांड्यात तेल आणि मोहरी आणि अगदी थोडी हळद याची फोडणी करावी. कांदे लांब लांब चिरुन परतावेत. कांदे नीट मऊ शिजणे गरजेचे आहे. कांदे शिजल्यावर मॅगी नीट कुस्करुन त्यात अगदी थोडावेळ परतावे आणि मग १ कप पाणी आणि मॅगीचा मसाला आणि हवा असल्यास गरम मसाला टाकून ३-४ मिनीटे घट्ट शिजवावे. आता उतरवून थंड होऊ द्यावे. आले लसूण मिरची मिक्सरमधे फिरवून घ्यावे. बटाटे कुस्करुन चवीला मीठ  आणि हे आले लसूण मिश्रण टाकून मळावे. लहान गोळा घेउन त्याची वाटी करुन त्यात चमच्याने मॅगी भरावे.(मॅगी घट्ट असावे.) आणि अंगठ्याने बटाटा वर आणून ही वाटी नीट सील करावी. कॉर्नफ़्लॉवर आणि अर्धा चमचा पाणी एकत्र करुन त्यात हे पॅटीस घोळवावे. आणि नंतर रवा अथवा पावाच्या चुर्‍यात घोळावे.
तेल गरम करुन त्यात ही पॅटीस अगदी फिक्या तपकीरी रंगावर तळावी.

टिश्यू पेपर वर निथळून सॉस (क्योंकी.. सॉस भी कभी टॉमेटो था.. वाला सॉस) बरोबर खावी.