इ-गव्हर्नन्स - तळागाळातले अनुभव

गुड गव्हर्नन्स ( सुराज्य) आणि इ-गव्हर्नन्स (मराठी शब्द सुचवा) बद्दल अलिकडे बरेच काही बोलले, लिहीले, वाचले जाते. इ-गव्हर्नन्स म्हणजे माझ्या मते दळणवळणाची अत्याधुनिक साधने (उदा.-संगणक) वापरून शासकीय कारभार अधिक पारदर्शी करणे, शासकीय सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे, प्रसारमाध्यमांचा वापर इ.  यामध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माहितीचा अधिकार सुलभपणे वापरता यावा म्हणून करणे, हे ही आलेच.   इ-गव्हर्नन्स चा अवलंब यशस्वी प्रकारे केल्याचे फुरसुंगी ग्रामपंचायतीचे उदाहरणही आपल्याला कदाचित माहिती असेल. (संगणकीकृत ग्रामपंचायत) अशी काही गाव पातळीवरची किंवा छोट्या शहरांमधील उदाहरणे कोणी सांगू शकेल का?