५३. हे स्वरांनो, चंद्र व्हा

हे स्वरांनो, चंद्र व्हा
चांदण्यांचे कोष माझ्या, प्रियकराला पोचवा ॥धृ.॥


वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥१॥


गायक : पं. जितेंद्र अभिषेकी
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
गीत : वि. वा शिरवाडकर
नाटक : ययाति आणि देवयानी