ताकातली भाजी

  • उकडलेले बटाटे
  • गरम मसाला / काळा मसाला
  • दही
  • जिरे
  • हळद
  • कांदा लसूण मसाला
१५ मिनिटे
एकास एक वेळ

बटाट्याचे खाण्यास योग्य असे हाताने तुकडे करणे. दहि पातळ करुन ताक करावे. गरम तेलावर फ़ोडणी टाकावी, त्यात बटाटे परतुन घ्यावेत. मग बटाटे थोडे खरपुस झाल्यावर, गरम मसाला/काळा मसाला, कांदा लसूण मसाला  टाकुन परत थोडा वेळ परतावे. थोड्या वेळाने ऊर्जेची तीव्रता कमी करुन त्यात ताक घालावे (भाजी पातळ हवी असल्यास जादा). मग चवी नुसार मीठ घाला. उकळुन थोडा छान वास आला आणि तेलाचा थोडासा तवंग आला कि भाजी तयार

मला तरि हि भाजी आवडते अन माझ्या साहेबांना पण. (मी एकदा जर्मनी मध्ये त्यांना हि खाउ घातली होती त्याची चांगली आठवण ते अजुन काढतात म्हणुन लिहिले :)