टोमॅटो भात

  • २ मध्यम आकाराचे टोमॅटो,१ मोठा कांदा उभा चिरलेला
  • १ वाटी बासमति तांदूळ
  • दालचिनी पूड,जीरे पूड
  • १ तमालपत्र
  • लाल तिखट,मीठ,साखर,
  • तुप
१५ मिनिटे
२ व्यक्ती साठी

प्रथम तांदुळ धुवुन ठेवावे. टोमॅटो चिरुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावे.प्रेशरपॅन मध्ये १ मोठा चमचा तुप टाकावे. त्यात तमालपत्र टाकावे.कांदा घालून लालसर होईतो परतावा.मग त्यात तांदुळ टाकुन २-३ मि. परतावे.

एक वाटी तांदुळाला दोन वाट्या टोमॅटोचा रस लागतो. दोन वाट्या रस घालावा.त्यात दोन चमचे लाल तिखट,पाउण चमचा दालचिनी पूड,पाउण चमचा जीरे पूड,मीठ,थोडी साखर घालुन २-३ शिट्या झाल्या की गॅस बंद करावा.  

  

वाढताना वरुन कोथिंबीर,ओला नारळ घालून सजवावे. हा भात लाल रंगाचा असतो.त्यामुळे सजलेला भात लाल-पांढरा- हिरवा असा दिसतो.

जोशीकाकू