टॅको

  • टॅकोज ची कवचे
  • पार्सली
  • लाल कोबी सोललेला
  • किसलेली गाजरे
  • कांदा बारीक उभा चिरलेला
  • राजमा
  • चेडार चीज
  • टोबॅस्को सॉस
  • मेयोनीज सॉस
  • मस्टार्ड सॉस
१५ मिनिटे
एकास एक वेळ

बाजारातून टॅकोजचं वरील सामान आणायचं. एखादी मस्तपैकी आवडती सीडी लावायची. त्या कवचात आधी थोडंसं गाजर/ लाल कोबी पसरायचा, मग शिजलेला राजमा, हवं तर थोडं मीठ, मग त्यावर मस्तपैकी चीज चा थर, आणि वरून पुन्हा एकदा गाजर/ कोबी, पार्सली ची पानं आणि कांदा - आणि चवीप्रमाणे वेगवेगळे सॉसेस...

वदनी कवळ म्हणायचं आणि उदरभरणास सुरूवात करायची.