गुंडाळी

  • १ कोबी लहान
  • १ उकडलेला बटाटा
  • १-२ मिरच्या
  • थोडेसे कॉर्न फ्लॉवर
१५ मिनिटे
एकास एक वेळ
'गुंडाळी' हा हात खराब न होता कोरड्या हाताने खाण्यास योग्य प्रकार.

कोबी चायनीज मधे असते तशी लांब लांब कापून घ्यावी. उकडलेला बटाटा कुस्करुन घ्यावा. आता कोबी +उकडलेला बटाटा अधिक २ सामान्य आकाराचे चमचे कॉर्नफ्लोअर आणि मीठ, मिरच्या बारीक करुन मळून घ्यावे. तेल गरम करुन त्यात हे मिश्रण थोडा वेळ परतावे. मिश्रण अगदी मऊ होऊ नये. फक्त कोबी अर्धी शिजेल इतपत परतावे. आता खाली उतरुन थंड करण्यास ठेवावे.
मैदा चवीपुरते मीठ, पाणी घालून घट्ट भिजवावा. त्याच्या चौकोनी पोळ्या लाटून त्यावर थोडे कोबी मिश्रण ठेवून गुंडाळी करावी. आणि उघड्या बाजू दुमडून नीट बंद कराव्या. अशा ४-५ गुंडाळ्या करुन ओव्हन मधे भाजाव्या.(तापमान माहीती नाही, कारण मी कधी ओव्हन मधे भाजल्या नाहीत.) ओव्हन नसल्यास तळून घ्याव्या. 

उपहारगृहात मिळणार्‍या 'स्टार्टर' च्या कल्पनेवर आधारीत हा प्रकार. करुन पाहिल्यास प्रतिक्रिया व चांगले/वाईट अनुभव कळवावे