नकळत नकळत, अलगत अलगत,
चार पाऊले सरसरली,
त्या पायान्च्या मार्गपथानी,
जीवनकहानी सान्गीतली.
...... हळूवार ती हलकीफुलकी,
चार पऊले डगमगली.
आयुष्याच्या काठावरही,
जगन्यासठी धडपडली.
त्या पायाना पडले प्रश्न,
... आता करावयाचे काय?
.. हताश मनाला चेइतन्याचा,
सूर गवसेल काय?
खड्बडीत हा रस्ता अपुला,
सुरळीत होइल का?
यालाच जीवन ऐसे नाव,
याला जीवन ऐसे नाव.
किसु.