सँडविच

  • ब्रेड स्लाइस ८, उकडलेले बटाटे ४,१/२ वाटी मटारदाणे,१ मध्यम कांदा
  • गरम मसाला १ चहाचा चमचा,मीठ चवीनुसार,बटर,किसलेले चीज २ टे‌.स्पून
३० मिनिटे
२ जणांना

बटाटे उकडून पावभाजीच्या स्मॅशरने स्मॅश करा किवा किसून घ्या.मटार उकडून तेही थोडे भरडून घ्या.कांदा बारीक,चौकोनी चिरा.१ चहाचा चमचा बटरवर कांदा घालून परता,त्यात गरम मसाला घालून परता‌ ,शिजले की उकडलेल्या बटाट्याचा लगदा/कीस घाला,परता.ठेचलेले मटार घाला,परता. मीठ घालून परता.आचेवरून काढा आणि त्यात किसलेले चीज घाला.मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
पावाच्या तुकड्याला बटरचा हलका हात लावून घ्या.त्यावर हे मिश्रण पसरा. दुसरा तुकडा त्यावर जरा दाबून बसवा. सँडविच टोस्टर मध्ये भाजा,नसल्यास तव्यावर थोडे बटर घालून सोनेरी रंगावर भाजा.
गरम गरम सँडविच टोमॅटो केचप बरोबर खा.

बरोबर वाफाळती कॉफी असावी,बाहेर बर्फ पडत असावं,मंद संगीतासाठी आपणच रेडिओ नाहीतर सिडी लावावी(हो!नाहीतर आपल्यासाठी कोण वातावरणनिर्मिती वगैरे करणार?)... आणि मनमुराद आस्वाद घ्यावा!

माझेच पाकप्रयोग