मुहुर्त

 


पाहतांना मांडवात तुला
थोडा सुवास दरवळला
तुझ्या गजर्‍याचा....

"मोगर्‍याच्या कळ्या आहेत मुक्याच
पण सुवास किती बोलका!"
असं तुच म्हणायची तेव्हा

आकाशभर पसरुन चांदण्या
किती खळाळुन हसायच्या
तुझ्या डोळ्यात...

"पुरे आता! शब्दांचे वैभव
सांभाळुन ठेव बघ
कधीतरी अपुरं पडेल मग तुला"

किती खरं होते ते..

"........... अरे हे रे काय?"
- तुझा प्रश्न रेंगाळुन राहिला
अन भरुन आलेल्या डोळ्यात
माझ्या रिकाम्या हातात..

भेट म्हणुन माझं मन आणलं होतं ना
पण काय उपयोग?
... माझ्या स्वप्नफुलांची गाठ सोडवत
तु कधीच मुहुर्त साधला होता..


- चिन्नु