कधी-तरी
आपणंच बोलावं स्वतःशी
आणि
आपणंच द्यावित
आपल्याचं प्रश्नांना उत्तरं.....
कधी-तरी
आपणंच हसाव स्वतःशी
आणि
आपणंच द्यावा धीर
आपल्याचं निराश्रीत अश्रूंना.....
कधी-तरी
आपणंच समजून घ्यावं स्वतःला
आणि
आपणंच दाखवावी दया
आपल्याच ओल्या जखमेवर.....
कधी-तरी
आपणंच गुणगुणावं स्वतःशी
आणि
आपणचं शोधत जावं
आपल्याच जगण्याचं रहस्य......
-दर्शनकुमार