कोथिंबीर वड्या

  • कोथिंबीर साधारण २ जुड्या
  • बेसन(हरभरा डाळीचे पीठ) अर्धी वाटी
  • तिखट पूड १ चमचा हवी असल्यास
  • तीळ १ चमचा
  • हळद फोडणीपुरती
  • खसखस १ चमचा
  • तेल तळणापुरते
  • चटणी हवी असल्यास दही,दाण्याचा कूट
३० मिनिटे
२ जणांसाठी

१. कोथिंबीर जाड देठे काढून(निवडून) बारीक चिरावी.
२. बेसन पीठ, हळद, मीठ, तिखट पूड,तीळ,खसखस घालून घट्टसर मळावे.
३. या मळलेल्या गोळ्याची सपाट पृष्ठभागावर वळून अंदाजे ६ सेमी व्यासाचे/डायमीटरचे (पट्टी घेऊन मोजले नाही तरी चालेल.) गुंडाळी अथवा सिलिंडर करावे.  
४. कुकरला शिट्टी न लावता ही गुंडाळी १० मिनीटे शिजू द्यावी.
५. थोडी गार झाल्यावर हलक्या हाताने(ती ज्या ताटावर ठेवून शिजवली त्या ताटाला थोडी चिकटली असेल न, म्हणून हलक्या हाताने.) काढून सुरीने साधारण बाकरवडीच्या आकाराचे तुकडे करावे.
६. तेल तापवून या वड्या खमंग(फिकट तपकीरी)रंगावर तळून घ्याव्यात. टिश्यू कागदावर अथवा स्टीलच्या चाळणीवर निथळाव्यात.
७. चटणी हवी असल्यास दही आणि तिखट मीठ आणि दाण्याचा कूट एकत्र करुन कालवावे.   

गरम गरम वाढावे. (वाढताना कागदाचे आकर्षक टिश्यू रुमाल बाजारात मिळतात त्यावर ठेवल्यास तेल पण कमी होईल आणि दिसायला पण चांगले दिसेल.) बरोबर सॉस किंवा दह्याची चटणी चांगली लागते.