अंडा राईस

  • १ कटोऱी शिळा/ ताजा भात
  • २ अंडी
  • १ टमाटर
  • १ छोटा कांदा
  • २ मिरच्या
  • तेल, मीठ, थोडीश्शी धने पावडर, थोडीश्शे जीरे , कोथिंबीर
१५ मिनिटे
माहीत नाही

फ़्राईंग पॅन मध्ये तेल गरम करा (जेव्हढे पसरट पॅन असेल तेवढे चांगले)

मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर

त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, कांदा चांगला परतल्यावर टमाटर अणी मिरच्या टाका, हे झाल्यावर जीरे , धनेपावडर टाका,

नंतर अंडी direct पॅन मध्ये फ़ोडा, भुर्जी सारखे फ़्राय करा,

भुर्जी थोडी ओली असताना , भात टाका (भात थोडा ऊशीरा टकला तर सगळी चव जाते)

चांगल फ़्राय करा, अंडा राईस तयार

वाढताना वरुन चीरलेली कोथिंबीर पेरा

अणी आवडले तर मला प्रतीसाद करा

 

 

संध्याकाळच्यावेळी खायला कींवा शिळ्या भाताला समाधीदेण्यासाठी ऊत्तम पाककृती

जं. म. रोडवरचा भुर्जी विकणारा गाडीवाला