जिवनामधील महत्त्वाचे घटक

 आपल्या रोजच्याच वापरातील काही गोष्टींनी आपल्या जीवनावर ताबा मिळवलेला असतो पण आपण एकदम गाफील राहतो व एक दिवशी वापरातील एखाद्या गोष्टीने दगा दिला तर काय मनस्ताप होतो ते आपल्यालाच माहीत मी खाली काही माझ्या रोजच्या वापरातील महत्वाच्या घटकांची माहिती लिहिली आहे व मी विचार केला अरे खरंच ह्यातील एखाद्या गोष्टीने दगा दिलातर माझा संपूर्ण दिवसच अस्ताव्यस्त होतो... असेच काही घटक तुमच्या जीवनामध्ये देखील असतील त्याची माहिती द्या.


 


वीज: ह्यांच्या शिवाय जीवन..... नुसतीचं कल्पना करा, आहाकार माजेल. ही जर १ तास जरी गायब राहिली तर मला एका युगासारखे वाटते... ह्याच्या शिवाय जीवनाला काहीच अर्थ राहत नाही.


संगणक : ह्या ने मला जगण्यातला खरा आनंद दिला व खरंतर माझ्या पोटापाण्याची व्यवस्था केली. ह्याच्या शिवाय जीवन..


कल्पना नाही कसे असेल.


महाजाल : कोल्हापूर सारख्या एका लहान शहरातला बिघडलेला मुलगा कधी महाजालाच्या प्रेमात पडला हे कळलेच, ह्या महाजालाने काय नाही दिले, जगभरातील माहिती, विविध मित्र, संगीत व पैसा. सर्व काही एका टिचकी मध्ये सामावलेले.
 
युनिकोड : जेव्हा महाराष्ट्रापासून ८ वर्षे दूर राहिलो व मराठी वाचन करण्याची प्रचंड भूक आवाक्याबाहेर जाऊ लागली तेव्हाच २००१ च्या आसपास युनिकोड वापरलेली विविध संकेतस्थळामध्ये मराठी संकेतस्थळे ही गाजू लागली व मनोगत सारखे एक प्रचंड मोठे व सोयी युक्त संकेतस्थळामुळे मला येथे दूरवर बसून ही महाराष्ट्रातील मृद्गंधाचा आनंद घेता येऊ लागला, दिवसाची सुरवात मनोगतापासून व दिवसाची समाप्ती देखील मनोगतावरूनच.


आय-पॊड : संगीत, काही कळो ना कळो पण गाणे ऐकणे हा एकच धर्म मी नियमित पाळतो, पहील्या पहिल्यांदा रेडिओ व नंतर संगणकावर तासंतास गाणी वाजायची... पण काम करता करता, बाहेर फिरता फिरता संगीत माझ्या जवळ २४ तास राहील ह्याची काळजी ह्याच वस्तूने घेतली.


चारचाकी : गुरगांव सारख्या सार्वजनिक वाहतूक प्रणाली नावाची वस्तू नसलेल्या शहरामध्ये चारचाकी किती महत्वाची आहे हे येथे आल्या शिवाय लक्षात येणार नाही, साधी भाजी आणण्यासाठी देखील ३-४ कि.मी. जेव्हा जावे लागते तेव्हाच कळते. ह्याच्या शिवाय गुरगांव मध्ये जगणे अशक्य.


दूरध्वनी : फिरता दूरध्वनी ... एकच शब्द आजच्या जगातील सर्वात महत्वाची व उपयोगी वस्तू. पण ही कधी कधी त्रासदायक देखील वाटते पण धरलं तर चावते व सोडले तर पळते अशीच गत. ह्याच्या शिवाय जीवनामध्ये अर्थच नाही. ह्याच्या मुळेच फिरता फिरता महाजाल पण आपल्यासंगे, जास्त नाही तरी ईपत्रे वैगेरा वाचता व उत्तरे पाठवता येतात हे काय कमी आहे.


दूरदर्शन (टी.वी.) चा रिमोट: ह्याचा उपयोग, सर्वांनाच माहीत आहे. ह्याच्या शिवाय करमणूक साध्य नाही..


गूगल सेवा : हा पठ्ठा कानामागून आला व तिखट झाला असा आहे, रोज काहींना काही नवीन सुविधा पुरवतच राहतो.गूगल शोध यंत्र माझे काम किती सोपे करतो हे शब्दात सांगणे कठीण. व गूगल अर्थ वर तर सगळे जग फिरून झाले अजून काय हवे ? :) जीमेल मुळे तर ईपत्र नष्ट करणेच विसरून गेलो आहे.



राज जैन