वात्रटीका

१)     चुकून जरी सिग्नल तुटला


       तरी सामान्यांना दंड आहे,


       कोपऱ्यावरच्या पानवाल्याकडे


       तो जमा करायचा ' फ़ंड' आहे.


 


२) 'सलमान'  असो वा 'परेरा'


     पिणाऱ्यांना नसतो धर्म,


    गरीबांचे बळी घेती


    धनिकपुत्रांचे (कु)कर्म !