वाचकांना सलग सर्व गाणी वाचता यावीत म्हणून ही सर्व गाणी माहीतीजालावर टाकली आहेत. त्याचा पत्ता असा.
http://chitrapatgeet.blogspot.com/
आपणाकडे जर कुठलीही मराठी गाणी युनिकोड स्वरूपात असतील तर ती मला मनोगतावर पाठवावीत म्हणजे मी ती माहीतीजालावर टाकीन. जास्ती जास्त गाणी एकत्र असावीत असे वाटते.
मिलिंद
तूच मायबाप बंधू तूच प्राणसखा
दीन दु:खितांचा एक तूच पाठीराखा ॥धृ.॥
धरित्रीची शय्या देशी आभाळाची छाया
जाणिवेच्या पलीकडे उभी तुझी काया
परी तुझ्या ओळखीला माणूस पारखा ॥१॥
तुझ्या हाती असे एक पुरातन काठी
आवाज न येई तिचा दिसे ना कुणा ती
कुणा देतसे आधार कुणाला तडाखा ॥२॥
सज्जनांचा कैवारी तू दुर्जनांचा वैरी
अनाथांच्या नाथा तुझी रूपे नानापरी
तुझ्याविना उभा जन्म होईल पोरका ॥३॥
गायक : श्रीकांत पारगावकर
संगीत : भास्कर चंदावरकर
गीत : सुधीर मोघे
चित्रपट : एक डाव भुताचा (१९८२)