जीवन..

आपले आपण जगायचे असते


सुख आपले, दु:खही भोगायचे असते,


कुणी दिले जरी आसु डोळ्यांना


आपण आपले हसायचे असते.


    कोणावर कधी रागवायचे नसते


    कधीच कोणाला दुखवायचे नसते,


    काही प्रसंग देतातही जखमा


    जखमांना कधीच घाबरायचे नसते.


         जीवन म्हणजे पसारा सारा


         आपले आपण आवरायचं असतं.


         नेहमीच होते पडझड आपली


         आपलं आपण सावरायचं असतं..


                                        जयेंद्र.