खासदार संतापले चॅपेलवर

खासदारांच्या टीकेचे मला आश्चर्य वाटलेले नाही, ते त्यांचे काम करीत आहेत. संसदेत यासाठीच त्यांना वेतन दिले जाते.'....... हे विधान आहे ग्रेग चॅपेल यांचे. आजकाल क्रिकेट मधे काही ना काही घडुन मनोरंजन खुपच चांगले होत असते. जरी ग्रेग चॅपेल यांनी हे विधान केले असले तरी त्यामागे  दडलेली सत्यता हि नाकारता येत नाही. खासदारांना देखिल क्रिकेट मधे रस असु शकतो ( शरद पवार यानीं म्हटल्या प्रमाणे), त्यांच्याही क्रिकेटबद्दल भावना ह्या जनसामान्यांप्रमाणे असु शकतात. पण देशासमोर असलेले प्रश्नांबद्दल या खासदारांना किती रस आहे हे सर्वश्रुत आहे. जर ग्रेग चॅपेल यानीं अशी विधाने करण्यापूवीर् चॅपेलने स्वत: भान ठेवायला हवे असे मत असेल तर स्व:ताचे मत प्रकट करताना राजकारण्यांनी तरी कुठे तारतम्यता बाळगली आहे. आधीक माहीती साठी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/606847.cms  आणि http://saamana.com/2006/nov/26/Index.htm वाचा.