इच्युका - मोआमा चा कुंभ मेळा?
कॉन्फेस्ट
ताल आणि नाच
आणि मग मला पण यात सामील व्हावेसे वाटायला लागले. पण इतक्या छान वातावरणात, कोणत्या तरी तंबू मध्ये बसुन काही तरी करावे असे वाटेना. मग तो भला मोठा बोर्ड वाचायचा अर्धवट्च सोडुन दिला. मी आणि गार्गी, वाळू मध्ये खेळायला गेलो. अनु ला पण काय करावे ते कळत नव्हते. ती पण आली. पण तेवढ्यात तीला, पेंटींग करावयाचा एक शामियाना दिसला. ती तिकडे गेली. वाळू वर खेळायला बरीच लहान मुले होती. गार्गी ला मजा वाटायला लागली. ती जरा रमली आहे असे पाहुन मी पण इकडे तिकडे काय आहे ते बघायला लागलो.
एक भले मोट्ठे झाड नदीवर आडवे पडुन त्याचा नैसर्गीक पूल तयार झाला होता. या पूला वरुन ४-५ वर्षांची मुलं, पाण्यात उड्या घेत होती. पोहोत परत काठावर येउन परत उड्या मारत होती. एक तरुण जोडपे अगदी जेमतेम कपडे घालून, छोट्याश्या होडीत बसून ती वलव्हण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची एक मैत्रिण बाजुलाच काठावर बसून त्यांना सूचना देत होती. एक जोडपे काठावरच सूर्याकडे तोंड करुन ध्यानाला बसले होते. एक आजोबा स्वत: ला वाळू मध्ये पुरुन घेण्याच्या प्रयत्नात होते. एक छोटा मुलगा त्यांन मदत करत होता.
एका बाजुला दोन खांबाना आकाराने लहान होत जाणारी लाकडे टांगली होती. हे वाद्य वाजवण्याचा एक लहान मुलगा प्रयत्न करत होता. मला पण ते वाजवावेसे वाटायला लागले. मग मी ते वाजवण्याचे दांडके हातात घेउन लटकवलेले ओंडके बडवायला सुरआत केली. त्यातून ठाँपठाँप असा आवाज येत होता. जरा खालची लाकडे वाजवली तर टुमटुम असा आवाज! जणू कही तबला आणि डग्गाच. खुपच मजा वाटायला लागली वाजवायला. ताल पण सापडला!
माझे वाजवणे ऐकुन अजुन एक (नंगा) माणूस मला हे चमत्कारीक वाद्य वाजवण्यात समील झाला. मग काही बिकीनी वाल्या आणि काहीच न घातलेल्या मुली पण आल्या आणि त्या तालावर नाचायला लागल्या. नदी काठावर ध्यानाला बसलेल्या जोडप्याने या सगळ्या कडे रागाने पहात जागा बदलली. एका मुली ने तर चक्क बेली डांस सुरु केला आणि मला म्हणते, " बॉलीवुड बॉलीवुड डांस!" ते पाहुन आजून पण काही लोक त्यंचे 'जेंबे ड्रम्स' घेउन वाजवत सामील झाले. एकुणच जल्लोष सुरु झाल्या सारखे वाटायला लागले. मी खरं कधी नाचत वगैरे नाही. (म्हणजे जमतच नाही! :) ) या सगळ्या तालाअर मी पण आपोआप नाचायला लागलो. किती वेळ यात गेला कळलेच नाही. जणू काही ध्यानच लागले!
तेवढ्यात आठवले की आपण गार्गी ला असेच सोडुन या नागड्या बाया बापड्यांसाठी लाकडे वाजवत बसलोय. हा विचार मनात येताच. माझी नजर भिरभिरली. पहातो तर काय,
गार्गी चक्क एका बिकीनी वाल्या आजींच्या सोबत छान वाळू मध्ये खेळत होती. मला अगदी हुश्श वाटले. वाजवण्याचे सोडुन मी गार्गी कडे आलो. आजीबाई मला म्हणतात, "युअर डोटर?" ओ, शी इज सो क्युट! शी वाँट्स टु प्ले विथ मी". मी म्हणालो, "आय ऍम शुअर शी वाँट्स टु प्ले" बट आय थिंक शी नीड्स फुड नाउ" आजीबाईंना बोलायचे होते, पण आता मला भुक लागली होती आणि गर्गी लापण लगणार होती.
टॉम सकाळी येतांनाच 'ओ धिस इज व्हेरी गुड, आय मस्ट डु धीस' म्हणून एका मेडीटेशन च्या तंबू मध्ये गायब झाला होता, तो अजुन काही परतला नव्हता. त्याचा नाद सोडून आता परत जाणे भाग होते. सूझी ला पण काही मित्र मैत्रिणि मिळाल्या होत्या ती गप्पा मरण्यात मग्न होती. मला भुक लागली होती.

पण अनु कुठे गेली होती?
क्रमशः