कॉफी

  • कॉफी
  • साखर
  • दूध(गरम)
  • साय
१५ मिनिटे
एका माणसा करता

नेहमीच्याच प्रमाणात कॉफी आणि साखर घ्यावी

कॉफी आणि साखर मिक्सर मधून काढावी , एकदम बारीक पूड झाली पाहिजे

एका उभ्या भांड्यात हे कॉफी-साखर पूड घ्यावी, त्यात साय ओतून चांगले फेटावे, विजेवरची रवी(ब्लेंडर) वापरली तर फारच छान

ह्या फेटलेल्या मिश्रणात दूध(गरम) ओतावे व नीट घुसळावे (फेस येई पर्यंत)

वाढताना\ कपात ओतताना असे ओतावे की फेस वरती राहील

वरून थोडी चॉकलेट पावडर भुरकावी

 

 

ह्या प्रकारची कॉफी एकदम दुर्गा स्टाइल लागते (एक्स्प्रेसो)

कॉफी थोडी  कडक करावी छान लागते,

मी बहुधा एका कपाला दीड चमचा कॉफी, दोन चमचा साखर आणि दीड चमचा साय हे प्रमाण घेतो

* माझी एक मैत्रीण कॉफी फेटून करायची(चमच्याने), मिक्सर, ब्लेंडर, साय  ची कल्पना माझी

माझी ऐक मैत्रीण*