बटाटेवडे प्रकार २

  • अर्धा किलो बटाटे
  • २-३ कांदे
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • १ लसूण गड्डा
  • १ चमचा दालचिनी, मिरे, लवंग यांचा गरम मसाला
  • हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • ५-६ ब्रेडचे तुकडे
  • ३ वाट्या डाळीचे पीठ
  • तळण्यासाठी तेल
  • लिंबाचा रस
  • १ चमचा साखर
  • चवीपुरते मीठ
१५ मिनिटे
दोन माणसांना एक वेळ

बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्यावेत. थोड्या पाण्यात ब्रेडचे तुकडे बुडवून मऊ करावेत व बटाट्यात मिसळावे. लवंग, मिरे, दालचिनीची बारीक पूड करून त्यात घालावी तसेच बारीक चिरलेला कांदा, मिरच्या, कोथिंबीर, थोडा लिंबाचा रस, १ चमचा साखर, चवीपुरते मीठ घालून मिश्रण चांगले हलवावे. वड्यांच्या आवरणासाठी डाळीच्या पिठात चवीप्रमाणे तिखट, मीठ,, हळद तेलाचे मोहन घालून पीठ भिजवावे व त्य पिठात मिश्रणाचे वडे बुडवून खमंग वडे तळावेत. ब्रेडमुळे वडे कुरकुरीत होतात.

नाहीत.

ईसकाळमधील रूचिपालट सदर