मनोगत दालन

सर्व मनोगतींना निवेदन,


आपणा सर्वां करिता मराठी विकिपीडियावर मनोगत दालन  हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.


विविध मराठी आभासी अनुदिनी संकेतस्थळांमध्ये परस्पर स्रोतांच्या देवाण घेवाणी करता सहकार्य प्रस्थापित करणे . मनोगत,मायबोली, याहू ग्रुप्स व इतरत्र संकेतस्थळांवरची प्रताधिकार नसलेली किंवा मुक्त माहिती विकिपीडियावर संकलित करणे व त्या माहितीचे विकिकरण करणे असे या प्रस्तावित प्रकल्पाचे स्वरूप आहे.


एक पेक्षा जास्त संकेतस्थळांवर कार्यरत सदस्या करिता  "सदस्य माहिती चौकट(साचे)"   तयार करून ती वापरण्यास सदस्यांना प्रोत्साहित करणे ,सदस्यांकडून सूचना संकलित करणे,विषयावर माहितीचे दुव्यांसहित सूचीकरण,शुद्धीकरण, संकलन,स्थलांतरण ,संदर्भीकरण इत्यादी प्रकल्प परस्पर सहकार्याने तडीस नेणे . या किंवा अशा बाबींचा यात समावेश करावा असे वाटते. तरी उत्साही सदस्यांनी आपला सहभाग संबंधित  विकिपीडिया प्रकल्प पानावर (दुवा) नोंदवावा हि नम्र विनंती.


 -विकिकर