टोमॅटोचे घट्ट पिठले

  • २ टोमॅटो
  • तेल, मोहरी, हळद, मीठ
  • तिखट/कांदा लसुण मसाला (KLM)
  • हरभरा डाळीचे पीठ
१५ मिनिटे
१ व्यक्ति

टोमॅटो बारिक वा मध्यम आकारात कापुन घ्यावा एका खोलग़ट भांड्यात. त्यावर पिठल्याला हव्या असलेल्या चवीचे मीठ पसरावे आणि थोडावेळ झाकुन ठेवावे (टोमॅटोला चांगले पाणी सुटे पर्यंत.)

कढईत फ़ोडणी करावी. त्यात टोमॅटो आणि त्याला सुटलेले पाणी टाकावे. मग त्यात तिखट/कांदा लसुण मसाला (KLM) टाकुन परतावे. जे पातळ मिश्रण होइल त्यात हरभरा डाळीचे पीठ पेरावे आणि घट्ट होइ पर्यंत परतावे. गरम गरम खावे - सोबत भाकरी वा पोळी.

पटकन होणारा सोपा पदार्थ, कधी ही करता येतो.

अनुभव आणि आवड