नाते प्रेमाचे

या जगात नाहि दुसरे


प्रेमाहून निर्मळ नाते


पण हेच नाते क्षणात आपुले


जिवन विस्कटून जाते


या नात्याला व्याख्या नाही


थोर सांगून गेले बरे


मात्र ते फार सुंदर असते


हे विधान आहे खरे


केव्हातरी मी हि केले होते


जिवापाड प्रेम एकीवर


पण माझ्या प्रेमाला तिचा


नकार आहे आजवर


मला दु:ख नाहि


तिच्या नकारार्थि उत्तराचे


दु:ख वाट्ते ते


तिच्या प्रेमाच्या व्याख्येतल्या


वासना आणि निव्वळ टाईमपास या शब्दांचे


तिला नाहि कळला


माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ


तिच्यासाठी वेचलेले


प्रेमाचे अनमोल क्षण ते


सारे गेले व्यर्थ


मी तिच्यावर आजही


मनापासून प्रेम करतो


मनातले प्रेमभाव


कवितेच्या रुपात वाहतो


कळेल तिला माझ्या


एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा


फार वेळ झाली असेल कारण


मी असेन देवाघरी तेव्हा


 


सदर कविता मी माझा असा एकटा या काव्यसंग्रहातून साभार


कवि : रवि विश्वासराव