६१. नकोच छेडू आज
प्रिया, नकोच छेडू आज
डोळ्यात उभी लाज, नकोच छेडू आज
भिरभिरत्या वार्यातुनी साद तुझी ऐकते
सळसळत्या पानातुनी प्रीत तुझी बोलते
होऊनी ये तू वसंत फुलातुनी आज.१
थरथरता हिरवळ ही, चाहुल तव लागते
तळमळता दिवस रात्र, स्वप्न तुझे जागते
होऊनी ये नीज परी स्वप्नातुनी आज..२
मेघावर नाव तुझे कोरले असे कुणी
पाण्यावर चित्र तुझे रेखिले असे कुणी
एकदाच वर्षत ये मेघातुनी आज ३
चित्रपटः लग्नाला जातो मी
गायिकाः आशा भोसले
संगीतः सुधीर फडके
गीतः मधुसूदन कालेलकर