६५. सत्य शिवाहुन सुंदर हे

६५. सत्य शिवाहुन सुंदर हे
दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे ॥धृ.॥


इथे मोल ना दामाचे, मोती होतिल घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य शुभंकर हे ॥१॥


चिरा-चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब अम्ही नच सागर हे ॥२॥


त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे ॥३॥


गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : सुधीर फडके
गायक : सुधीर फडके
चित्रपट : जोतिबाचा नवस