७१. डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी ॥धृ.॥
आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस
आली सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी ॥१॥
नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी, तुला आठवून भरुन येण्यासाठी ॥२॥
वेल मोहरुन आली, फुले अंगभर झाली
वारा कशासाठी, गंध वनातून पाखरु होण्यासाठी ॥३॥
असा तुझा भरवसा, चांदण्यांचा कवडसा
ओठ कशासाठी, थोडे थरारुन जुळून जाण्यासाठी ॥४॥
गीतकार : माहित नाही
संगीतकार : माहित नाही
गायक : अरूण दाते