भुत दिसलाच नाय

लहानपणापासुन गावातल्या भुतांच्या गोष्टी एकुन होतो. असेच एकदा काकांबरोबर गावी चाललो होतो. रात्री निघायचे होते. जी एसटी पकडणार होतो ती आमच्या गावात थांबणार नव्हती तर आमच्या  गावाच्या आधीच्या गावाला थांबणार होती. मध्यरात्री ३ वाजता एसटी त्या गावात आली. आम्ही उतरलो काकांना म्हटल एक तास थांबुया ४ नंतर जाउया कारण एकुन होतो ४ नंतर भुतांचा वावर नसतो. काका म्हणाला आताच जाउ या. म्ह्टल जाउया. आम्ही निघालो तेव्हड्यात दोन माणसे दिसली आम्हाल त्यांनी पाहीले म्हणाले कोणत्या गावचे आम्ही सांगीतले आम्ही या गावचे ते म्हणाले आम्ही पण त्याच गावचे चला जाऊया. आम्ही निघालो त्यांच्याबरोबर रस्त्यावर काळोख आम्ही चालतोय . मनात निरनिराळे विचार येत होते हे दोघ भुततर नाहीत ना. कारण आम्ही शांतपणे चाललो होतो. कोण कोणाशी बोलत नव्हते. प्रत्येकाच्या मनात भिती होती वाटत आपल्याबरोबर भुत तर नाहीत ना. तेवढ्यात मला वाटत होत की आपल्याबरोबर पांढऱ्या रंगाचे  कोणि तरी चालतय. मी घाबरलेलो पण सांगणार कोणाला मान खाली घालुन चालत होतो. तो पांढरा रंग कधी जवळ तर कधी लांब असा आमच्या बरोबर चालत होता. इथे माझी हवा गुल. तेवढ्यात गाव जवळ आले गावाच्या वेशीवर दिवा होता तेव्हा कळले तो पांढरा रंग रस्त्याच्या कडेला लावलेला पांढरा रंग होता. मनातल्या मनात हसत घराकडे निघालो कारण ४ वाजुन गेले होते. यावरुनच मनात असेल तर कीवा आपण मानत असेल तर आपल्याला भुतांचा भास होतो असे मला वाटत.


आपला


कॉ.विकि