भोपळी मिरचीची चटणी

  • लाल रन्गाची भोपळी मिरची (२)
  • ३-४ सुक्या लाल मिरच्या
  • १ /२ चहा चमचा चिन्च पेस्ट
  • १-२ कढीपत्ता
  • मीठ चविनुसार
१५ मिनिटे
३-४ व्यक्ती

 भोपळी मिरचीचे बरीक तुकडे करुन तयर ठेवा.

भान्ड्यात तेल तापवा. त्यात मोहरी घाला.

मोहरी तडतडु लागली की त्यात चिमुट्भर हिन्ग व कढीपत्ता टाका.

त्यात भोपळी मिरचीचे तुकडे टाका,सुकी लाल मिरची टाका.

चीन्चेची पेस्ट टाका,चवीनुसार मीठ टाका.

भान्डयावर झाकण ठेवा  व मन्द आचेवर हे मिश्रण शिजु द्या.

मिश्रण शिजल्यावर शेगडीवरुण ते उतरवा आणि ते थोडे ठन्ड होवु द्या.

मग त्त्यातिल कढीपत्ता काढुन टाका व मिश्रण मिक्सर मधुन काढावे.त्यात पाणी कमीतकमी टाकावे.

आणि भोपळी मिरचीची चटणी तयार.

ही चटणी कशाही बरोबार तोन्डी लावायला चान्गली लागते.

फ़्रिजमध्ये  ठेवल्यास ही ७-८ दिवस टिकते.

 

चटणीचा लाल रन्ग येण्यासाठी लाल रन्गाची भोपळी मिरची आवश्यक आहे.

तिखट पणासाठी लाल सुक्या मिरच्या जास्त घ्याव्यात.

मैत्रिण