सखिये माझीया मनाला...

-------महाकवी वात्रटाग्रज ह्यांची दारूण कविता---------


सखिये माझीया मनाला
तूझीया प्रेमाची आस आहे,
चिकनगूनियाचा गे तोच मी
जहरीला डास आहे.


साजना,काय रे वर्णावा
तूझा राजसा रूबाब,
जैसा कॅफे कॅनडा मधला
तू रे ताजा कबाब.


सखिये मजला माहीत ती
स्वप्नातील सुंदर गोष्ट आहे,
तूजलाही जन्मापासूनच गे
कवितेचा बद्धकोष्ट आहे.


साजना,तूच रे माझा 'मून्ना',
 'लगे रहो ' मध्ये जरी
बापूजींचा गांधीवाद आहे,
साऱ्या सिस्टमच्याच बूडाला
जडला मूळव्याध आहे!


---वात्रटाग्रज


(सूचना::ही कविता वाचून कोणास गॅस्ट्रो ची भावना झाल्यास  ती कवीची
ज(क)बाबदारी नाही)