तुझी गाणी..

मी लिहिले जे
त्याला अर्थ नाहीत
हे शब्द तुझे
ते ही व्यर्थ नाहीत


लेखणी म्हणाली काय
आता मी लिहू
शब्दांचा पडला
दुष्काळ कसा मी पाहू


शब्द शब्द
हा शब्दांचा बाजार
मी स्वप्ने विकली
शब्दांची लाचार


संदर्भ शोधिला
त्यांनी शब्दां शब्दांचा
परी झाला नाही
बोध तुझ्या अर्थाचा


शब्दांच्या दिठीवर
वेदना माझी व्याली
शब्दांच्या माझ्या
तुझी गाणी झाली


 - अनिरुद्ध अभ्यंकर