पुणे कट्टा सहभाग

पुणे कट्ट्यामध्ये सहभागी होणाऱ्या मनोगतींसाठी या काही अखेरच्या सूचना:
१. शनिवार सायंकाळपासून कट्ट्यात सहभागी होणाऱ्यांनी कृपया मला गुरुवार सायंकाळपर्यंत व्य. नि. ने आपला सहभाग नक्की झाल्याचे कळवावे. त्यानुसार शनिवार सायंकाळच्या भोजनाची व्यवस्था करणे सोईचे होईल. व्यं. नि. पाठवताना कृपया आपली भोजनाची आवड (शाकाहारी / मांसाहारी) कळवावी.
२.रविवारी सकाळी येणाऱ्यांनीही आपला सहभाग नक्की करावा.
३. इतर तपशीलासाठी कृपया 'कार्यक्रम' या दुव्यातली पुणे कट्ट्याची माहिती पहावी.


ऐनवेळी सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यास नियोजन करणे अवघड होईल, म्हणून ही पूर्वसूचना.
सन्जोप राव