यातना...

आभाळाच्या यातना
कळतात माझ्या पंखांना...

जमिनीच्या यातना
कळतात माझ्या पायांना...

ह्या दोन यातनांतील
अंतर मोजनारी ही पावसाची रेघ...
आभाळ कोसळतं पायांशी तेव्हा-
टाचेवर माझ्या विजांची भेग!

-------------मयूर---------