प्रथमच कविता करतोय त्यामुळे चुका आढळल्यास माफ करावे
सांग महाराष्ट्रा सांग
पुरोगामी महाराष्ट्रा सांग
काय चाललय ते सांग
अन्नदाता संपवतोय इथे जीवन
आया बहिणींवर होतोय इथे बलात्कार
तिथेच जाळून त्यांना जातय मारल
हेच का तुझे पुरोगामीपण
की बुरखा चढवलास नुसता
सांग महाराष्ट्रा सांग .
थोर समाजसुधारकांच्या
राष्ट्रा काय चाललय ते बघ
जाती पातीत तु विभागला गेलास
विदर्भ,कोकण,खान्देश,
उ.,प.महाराष्ट्र,मराठवाडा
नांदतील कधी एकत्र
ते सांगशील का महाराष्ट्रा
आपला
कॉ.विकि