मुगाची खिचडी

  • दीड वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ
  • ६ वाटया पाणी,
  • १ चमचा धनेपूड, ५-६ कडीपत्त्याची पाने, २ चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचे काळा मसाला,
  • तेल, मोहरी, हिंग, १ चमचा जिरे,
  • २ चमचे साजूक तूप, खवलेले खोबरे , कोथींबिर,
  • २ चमचे चिंचेचा कोळ, १ चमचा गुळ
३० मिनिटे
४ जण


प्रथम तांदूळ डाळ एकत्र करून धुवून निथळत ठेवावी. एका भांड्यात वाट्या पाणी उकळायला ठेवावे. एकीकडे कुकरमधे (शक्यतो पसरट) तेलाची फ़ोडणी करुन हिंग, जिरे, कडीपत्त्याची पाने टाकावीत. आता त्यात निथळलेले तांदूळ टाकून मोठ्या आचेवर परतावे. परतून पांढरे शुभ्र दिसायला लागले की हळद, तिखट, काळा मसाला, धनेपूड टाकून परत चांगले परतावे. थोडा तडतडल्याचा आवाज आला की उकळलेले पाणी टाकून ढवळून कुकरचे झाकण नुसते ठेवावे. (पूर्ण लावू नये. फक्त मसाल्याचा स्वाद उडु नये म्हणून!) अधुन मधून ढवळत राहावे. थोडे पाणी आटत आले की, चिंचेचा कॊळ, गुळ, चमचे साजूक तूप आणि मीठ टाकावे. एक वाफ आली की कुकरचे झाकण पूर्ण लावून घ्यावे. - शिट्ट्या काढून गॅस बंद करावा.


खिचडी दबली की गरम गरम वाढून वर खवलेले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याने सजवून पानात घ्यावी. हवे असल्यास वरून परत साजूक तूप घ्यावे. आणि काय?? मस्त ताव मारावा. :)


१) गृहिणींसाठी उपयुक्त टीप: घरात काही शिळे उरले असेल (उदा. आमटी, वरण, भात इ.) तर कुकरचे झाकण लावण्याआधी, यामधे बेलाशक खपवता येते. ;-)


२) चिंच-गुळ घातल्यामुळे एकदम मस्त चव येते. पण त्यामुळे मसाला थोडा वाढवावा. नाहीतर गोडसर लागते.


३) कुकरचे झाकण लावताना पाणी कमी वाटले तर पेलाभर पाणी अजून टाकून मग झाकण लावावे.


४) ही खिचडी म्हणजे आजारी माणसासाठी उत्तम आहार आहे. फक्त त्यावेळेस मसाल्य़ाचे प्रमाण जरा कमी करावे.

सौ. आई आणि थोडा स्वानुभव.