प्रहर

उगवता सुर्य


किरण-फ़ुले


तुझ्यासवे


भवताल झुले....


निरव दुपार


शांत रस्ते


तुझ्यासवे


ऊनही हसते...


चांदण-वेळी


लाटांची गाज


डोळ्यांत तरंगे


नवथर लाज......


शीला