मागणे हेचि

करीन साजरे। अपयशाचे सण। यशाचे उधाण। पचवीन॥


रिचवीन कुम्भ। बेधुन्द क्षणांचे। तीव्र वेदनांचे। आनंदाने॥


मिळू नये मज। ऐसा क्षण एक। वांझ कफ़ल्लक। मात्र कधी॥


मागल्या क्षणाचा। भार वाहणारा। वाट पाहणारा। पुढल्याची॥