'सकाळ' मधील बातमी:
'मराठबोली' तर्फे रविवारी ता. १० रोजी राज्यस्तरीय काव्यवाचन आणि काव्यलेखन स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये राज्यभरातील तीनशे स्पर्धक सहभागी झाले आहेत. दोन्ही स्पर्धांमधून प्रत्येकी दहा स्पर्धकांना पारितोषिके दिली जातील. स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरुप आहे. स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी दहा वाजता कवी म. भा. चव्हाण यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. जयदेव गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल भोसले, माजी महापौर दिलीप बराटे या वेळी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक्वितरण समारंभ सायंकाळी पाच ते सात या वेळेत 'सकाळ' चे संपादक यमाजी मालकर यांच्या हस्ते होणार आहे. मसापचे प्रा. मिलींद जोशी या वेळी उपस्थित राहणार आहेत.